STORYMIRROR

Sneha Kale

Drama Inspirational

4  

Sneha Kale

Drama Inspirational

तू रणरागिणी हो

तू रणरागिणी हो

1 min
419

जननी तू, भगिनी तू, पुत्री तू, आहेस तू सहचारिणी

नानाविध रूपे तुझी, सौंदर्यवती तू, तू मनमोहिनी


दैवी गुणांची खाण तू अफाट तुझी सहनशक्ती

त्यागमूर्ती,अष्टावधानी,आहेस तू भगवंताची सर्वोत्तम कलाकृती


पुरुषप्रधान संस्कृतीतील प्रत्येक क्षेत्री बरोबरीने

स्वयंसिद्धा होऊनी कर्तव्य निभाविशी नेटाने


देवी म्हणूनी पूजती तुला नवरात्री

असे असूनही न मिळे तुला सुरक्षिततेची खात्री


जिथे जाई तिथे पाठलाग करी वखवखलेल्या नजरा

बलात्कारच तो हात न लावता केला जाणारा


अत्याचार होत आहे तुझ्यावर घरी आणि दारी

पीडिता म्हणून हिणवी पण कोणी मदत न करी


पूरे झाले रडगाणे आता उठ तू त्वेषाने

घायाळ करणाऱ्या नजरा आता आग ओकू दे रागाने


राजमाता जिजाऊ, रणरागिणी राणी लक्ष्मीबाई ,

महाराणी पद्मिनी , राजयोगिनी अहिल्याबाई


आदर्श मानूनी या लढवय्या स्त्रियांचा

घे धडा तू स्वसंरक्षणाचा


रक्षण तुझ्या शीलाचे तूच करी स्वावलंबी बनूनी

शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवूनी


अबला नको तू रणरागिणी हो, रणात लढणारी रागिणी हो

दुर्गा हो , चंडिका हो, तू महिषासुरमर्दिनी हो  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama