STORYMIRROR

Sneha Kale

Abstract Others

3  

Sneha Kale

Abstract Others

थंडीचा महिना

थंडीचा महिना

1 min
186

अंगावर शिसारी आणणारी थंड हवेची झुळूक

भासे जणू हिवाळ्याची चुणूक


झाडांची पानगळ सुरू होऊन फुटती पाने नवी

शरद ऋतूच्या आगमनासाठी धरा सज्ज होई


उन्हाळ्यात नकोसे वाटणारे ऊन हवेहवेसे वाटे

उबदार पांघरुणात पडून राहण्याची इच्छा मनात दाटे


पहाटे धुक्यांमुळे रस्ते झाकून जाई

सूर्यनारायणाचे दर्शन देखील होत नाही


थंडीचा महिना असे सगळ्यांच्या आवडीचा

उत्साही राहून क्रियाशील बनून राहण्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract