STORYMIRROR

Sneha Kale

Abstract Fantasy Others

2  

Sneha Kale

Abstract Fantasy Others

आगमन पावसाचे

आगमन पावसाचे

1 min
69

पहाटे पहाटे ढग भरून आले

काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ व्यापून गेले


बेभान वाहे वारा त्याला साथ ढगांच्या गडगडाटाची

चाहूल लागे तेव्हा पावसाच्या आगमनाची


हिरवेगार गवत वाऱ्यासंगे डोलू लागे

झाडे पाने फुले यांची त्यांना साथ मिळे


पावसाचे टपोरे थेंब अलगद धरतीवर उतरू लागे

मन मोहून टाकणारा मृदगंध दरवळे


पावसाच्या थेंबाने धरती हर्षभरित होई

प्रत्येक व्याकुळ जीव उल्हासित होई


लेवुनी साजशृंगार नटली नववधू

खुलू लागले सौंदर्य निसर्गाचे जणू


ओल्या चिंब पावसात चिंब चिंब न्हायले

पावसासंगे पावसाचे चिंब गाणी मी गायले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract