STORYMIRROR

Sneha Kale

Inspirational Others

2  

Sneha Kale

Inspirational Others

जरा विसावू

जरा विसावू

1 min
74

कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांनी खांदे झुकले

आयुष्य सारे फक्त कष्ट करण्यात गेले


दुसऱ्यांसाठी जगून झाले, आपले जगायचे राहून गेले

आनंदाचे क्षण अनुभवायचे राहून गेले


लोकलमधल्या गर्दीतून प्रवास करताना पर्वा नाही केली

जीवाची चिंता होती तुझं आणि मुलांचे पोट भरण्याची


संसाराच्या आपल्या वेलीवर दोन फुलं उमलली

बघता बघता ती देखील आपल्या संसारात गुंतली


शरीर थकले आता, आली ना ग साठी

आता थांबीन म्हणतो थोडसं, जगतो स्वतःसाठी अन तुझ्यासाठी


आयुष्याच्या नवीन वळणाची सुरुवात म्हणजे सेवानिवृत्ती

घर बांधुनी झाले, झाली आपल्या स्वप्नांची पूर्ती


संध्याकाळच्या वेळेत मोकळ्या हवेत फिरायला जाऊ

चहाचा घोट घेता घेता खूप गप्पा मारू


यापुढील आयुष्याचा प्रत्येक क्षण फक्त

आपण दोघ जगू हरवलेले क्षण पुन्हा शोधून काढून जरा विसावू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational