गुढी उभारू
गुढी उभारू
गुढी उभारु आपण आज, एक एकांताची
चला हरवू कोविड १९, जग
जिंकण्याची।।
चैत्र शुद्ध प्रतिपदा हे हिंदू नववर्ष
गुढी पाडवा म्हणा प्रतिपदा होई हर्ष
कोरोनाचा घेऊ आता खरा परामर्श
गुढी उभारु स्व इच्छा अलगीकरणाची।।१।।
चला हरवू...
आर्यलोकी ध्रुवप्रदेशी सूर्यकिरणात
सहा माह दिस अन् सहा माह अंधारात
देशी पडता पहिले किरण कृपा भगवंत
गुढी उभारू वर्षारंभी वसंत महिन्याची।।२।।
चला हरवू...
शालिवाहन शके पाडवा साडे तीन मुहूर्ती
ब्रह्मदेवाने सृष्टी रचली याच शुभ मुहूर्ती
श्री राम अयोध्या पोहोचले याच ब्रह्म मुहूर्ती
गुढी उभारू डॉक्टर सल्ले
विलगीकरणाची।।३।।
चला हरवू...
एक उंच काठी तीज नेसले रेशमी वस्त्र
साखरेच्या पदकाची माळ वर लिंबोनीचे अस्त्र
फुलांचा हार शोभे, आंबा डहाळीचे शस्त्र
गुढी उभारू तांबा व चांदी लोटी असण्याची।।४।।
चला हरवू...
महाभारती राजा वसू जंगलात गेला
तपश्चर्या खूप केली देव प्रसन्न झाला
देवाने वैजंयती माला व राजदंड दिला
गुढी उभारू स्व:ला स्व:भेटण्याची।।५।।
चला हरवू...
आरोग्य वर्धक कडूनिंब रस चाखण्याची
गोडधोड पक्वान्नी गुळवेल सत्व हाणण्याची
लिंबू पाणी, कैरी पन्हे हा बेत आखण्याची।
गुढी उभारु प्रतिकार शक्ती अंगीकारण्याची।।६।।
चला हरवू कोवीड १९, जग जिंकण्याची।
गुढी उभारू आपण आज, एक
एकांताची।।
