STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Classics

3  

Dattatraygir Gosavi

Classics

अमृत महोत्सवी पाळणा (भाग ५)

अमृत महोत्सवी पाळणा (भाग ५)

1 min
159

साडेसात दशकांचा मेळा

सुर्य चंन्द्र झाले ते गोळा ।

अमृत महोत्सवी हाले पाळणा

जो बाळा जो जो रे ,जो ।।धृ।।

या दशकाच्या पहिल्या नमनाला 

स्वर्ग उतरते त्या धरतीला ।

स्वतंत्र राज्य गोवा तो झाला

जो बाळा जो जो रे ,जो।।१।।      

 सन एकोणावीसशे अठ्ठ्या ऐंशी

मतदान वयोमर्यादा हंग्अशी 

एकवीस वरुन अठरा केली अशी 

जो बाळा जो जो रे ,जो ।।२।।        

सन एकोणावीसने एकोण नव्वद

राजीव गांधी ने दिली सनद ।

श्री राम मंदिर शिलान्यास घोष

जो बाळा जो जो रे ,जो ।।३।।

सन एकोणावीसशे नव्वद

व्ही.पी.सिहांनी दिली उमेद।

मंडल आयोग अंमल अभेद

जो बाळा जो जो रे ,जो ।।४।।  

सन एकोणावीसशे एक्यानव् 

आर्थिक संकटी सापडली नाव।

सोने गहाण ठेवी चन्द्रशेखर बावा 

जो बाळा जो जो रे ,जो।।५।।

पडघम होती सुरु लोकसभेची 

प्रचार सभा ती तामिळनाडूची ।

कटा द्वारे हत्या राजीव गांधीची

जो बाळा जो जो रे ,जो ।।६।।

सहानभुतीच्या लाटेवर येती

पी.व्ही.नरसिंहरावाची भरती।

खाजगी वउदारीकरन निती 

जो बाळा जो जो रे ,जो ।। ७।।

आले सन एकोणावीसशे ब्यान्ऊ 

शेअर दलाल हर्षद मेहता म्याऊ।

 रोखे घोटाळ्यांचे खाल्ले खाऊ

जो बाळा जो जो रे ,जो ।।८।।

सहा डिसेंबर महानिर्वान दिनी

एकोणावीसशे ब्यान्ऊ चे गाणी ।

बाबरी ढाच्याची पुरती झाली हानी

जो बाळा जो जो रे ,जो।।९।।

बारा मार्च या काळ्या दिवसाला

एकोणावीसशे त्र्यान्ऊ सालाला ।

मुंबई बाँम्ब स्फोट मालिका झाली

जो बाळा जो जो रे ,जो।।१०।।

एक तारीख दहावा महिना 

भुमी अभिलेखाची पुर्नरचना।

तालुका पातळीवर उभारणा 

जो बाळा जो जो रे ,जो।।११।।

सन एकोणावीसशे पच्यांन्ऊ

राष्ट्रीय लोक आकारास देऊ।

जया ममता मायावती भाऊ 

जो बाळा जो जो रे ,जो ।।१२।।

सन एकोणावीसशे छ्यान्ऊ

अटलजींच्या आले नाकेन्ऊ ।

तेरा दिवसाचे सरकार भाऊ 

जो बाळा जो जो रे ,जो।।१३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics