STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

अमृत महोत्सवी पाळणा (भाग ७)

अमृत महोत्सवी पाळणा (भाग ७)

1 min
140

साडे सात दशकांचा मेळा

सुर्य चंन्द्र झाले ते  गोळा ।

अमृत महोत्सवी हाले पाळणा

जो बाळा जो जो रे ,जो ।।धृ।।

दोन हजार सात   साली

प्रतिभा ताईंची निवड केली।

पहिली महिला राष्ट्रपती झाली 

जो बाळा जो जो रे ,जो।।१।।

दोन हजार आठ सालाला 

'चन्द्रयान एक' गेला मोहीमेला ।

असं करणारा देश "चवथ" झाला 

जो बाळा जो जो रे ,जो।।२।।

याच वर्षी बीजींग आँलिम्पिक

अभिनव बिंद्राचे सुवर्ण पदक ।

भारताचे वैयक्तिक तीन पदक

जो बाळा जो जो रे ,जो ।।३।।

याच वर्षी मुंबई वर हल्ला

लष्कर तोयबाचा होता सल्ला ।

अजमल कसाब पकडला मुल्ला

जो बाळा जो जो रे ,जो।।४।।

दोन हजार न्ऊ सालाला

आधार चा शुभारंभ झाला।

नंदन निलेकनी प्रमुख केला

जो बाळा जो जो रे ,जो।।५।।

दोन हजार बाराला संकल्प

सुवर्ण चतुष्कोण रस्ता   प्रकल्प ।

मोठ्या शहरांचा केला कायाकल्प

जो बाळा जो जो रे ,जो।।६।।

पुढे दोन हजार आले तेरा 

लोकपाल कायद्याचा तोरा ।

भ्रष्टाचार आंदोलनाचा होरा

जो बाळा जो जो रे ,जो।।७।।

याच वर्षी सोडलं मंगळ यान 

पाच नोव्हेंबर होता तो दिन ।

मार्स आँर्बिटरचे झाले प्रक्षेपण 

जो बाळा जो जो रे ,जो।।८।।

सन दोन हजार चौदाचं सालं

स्पष्ट बहुमताचं सरकार आलं।

नरेंद्र मोदींचे ओम $कार बोलं

जो बाळा जो जो रे ,जो।।९।।

आठ नोव्हेंबर अमृत योग

दोन हजार सोळाचा भोग।

नोटाबंदीचा केला प्रयोग

जो बाळा जो जो रे ,जो।।१०।।


Rate this content
Log in