STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Classics

4  

Dattatraygir Gosavi

Classics

अमृत महोत्सवी पाळणा (भाग४)

अमृत महोत्सवी पाळणा (भाग४)

1 min
232

साडेसात दशकांचा मेळा

सुर्य चंन्द्र झाले ते गोळा ।

अमृत महोत्सवी हाले पाळणा

जो बाळा जो जो रे ,जो ।।धृ।।


पहिल्या वर्षी पहिला पोळा

मोरारजीच्या गळी पडल्या माळा ।

बिगर काँग्रेसचा मुखिया झाला

जो बाळा जो जो रे,जो।।१।।


सन एकोणावीसशे अठ्याहत्तर

विश्वास पात्र झाले देसाई सरकार।

केली स्वस्त तेल ,गुळ नि साखर 

जो बाळा जो जो रे ,जो ।।२।।


सन एकोणावीसशे एकोण्ऐंशी

एक जानेवारी तारीख सरशी ।

मंडल आयोग स्थापना करशी 

जो बाळा जो जो रे ,जो।।३।।


सन एकोणावीसशे ब्या-ऐंशी

आशियाई स्पर्धा झाली या देशी।

घरोघरी रंगीत टीव्ही  दर्शनाशी

जो बाळा जो जो रे ,जो ।।४।।


सन एकोणावीसशे त्र्या-ऐंशी

भारत भिडले वेस्ट्इंडजीसशी । 

उंचविला विश्वचषक कपिल देवजी

जो बाळा जो जो रे ,जो ।।५।।


पुढील साल भारी तो काळ

अनेक घटनांचा असे सुकाळ।

राकेश शर्मा गेले अंतराळ 

जो बाळा जो जो रे ,जो ।।६।।


याच साली झाली ती हत्या

इंदिरा गांधी होत्या निहत्या।

अंगरक्षकाने केली ती हत्या 

जो बाळा जो जो रे,जो ।।७।।


एकामागे एक अशी दुर्घटना

विषारी वायु गळती भोपाळ घटना ।

हजारोचे बळी नि अपंग यातना 

जो बाळा जो जो रे ,जो ।।८।।


सन एकोणावीसशे पंच्याऐंशी

शाहबानो खटला गाजलाशी।

निर्णय फिरवी राजीव तोंडघशी 

जो बाळा जो जो रे ,जो।।९।।


दशकाची अखेर झाली लाच पोशी 

बोफोर्स तोफेची झाली खरेदी जशी।

बोफोर्स घोटाळ्यांची डसे मदमाशी

जो बाळा जो जो रे ,जो।।१०।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics