STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Classics

3  

Dattatraygir Gosavi

Classics

अमृत महोत्सवी पाळणा (भाग २)

अमृत महोत्सवी पाळणा (भाग २)

1 min
142


साडेसात दशकांचा मेळा

सुर्य चंन्द्र झाले ते गोळा ।

अमृत महोत्सवी हाले पाळणा

जो बाळा जो जो रे ,जो ।।धृ।।

असे सामाजिक स्वातंत्र्य सुर्य

चौदा आक्टोबरी" बौद्ध "दीक्षा धर्म ।

सहा डिसेंबर महानिर्वान सुर्य

जो बाळा जो जो रे ,जो।।१।।

राज्य मागणी साठी केले उपोषण

कामी आले '"श्री रामुलु " धन।

होई राज्य पुनर्रचना कायदा जन्म 

जो बाळा जो जो रे ,जो।।२।।

पुढे भारतीय चित्रपट नांदी

'राजा हरिश्चंद्र 'मुहूर्त पेढी ।

झाली "मदर इंडिया" आँस्कर वारी

जो बाळा जो जो रे , जो ।।३।।

सन एक़णावीसशे एकोण साठ

राष्ट्रपती डाँक्टर राजेंद्र प्रसाद।

झाला रिझर्व्ह बँक कायदा पास

जो बाळा जो जो रे ,जो ।।४।।

एक मे एकोणावीसशे साठ

महाराष्ट्र चळवळीची गोठ ।

मुख्यमंत्री यशवंत चव्हाण थेट 

जो बाळा जो जो रे ,जो।।५।।

अन्नधान्य स्वयपुर्ण व्हावा देश।

सिंचन नि बी बीयाने विकास

हरितक्रांती एकोणावीसशे साठ 

जो बाळा जो जो रे ,जो।।६।।

एकोणावीस डिसेंबर ला 

एकोणावीसशे एकसष्टला ।

विजय अभियानाचा बोलबाला

जो बाळा जो जो रे ,जो ।।७।।

असे स्वर्ग गोवा दीव नि  दमन

तसेच आम्हा पाँडेंचरी अभिमान ।

पोर्तुगीज नि फ्रेचांची कापली मान

जो बाळा जो जो रे ,जो ।।८।।

सन एकोणावीसशे बासष्टला 

चीनने अक्साई चीन बळकवला ।

हिंदी चीनी भाई भाई नारा मेला 

जो बाळा जो जो रे ,जो ।।९।।

आले सन एकोणावीसशे त्रेसट 

पहिले अग्निबाणकेले प्रक्षेपित ।

अवकाश संशोधन पेटली ज्योत 

जो बाळा जो जो रे ,जो ।।१०।।

सन एकोणावीसशे  चौसष्ट

जय जवान जय किसान कष्ट ।

दिला नारा शास्त्रीजींने स्पष्ट

जो बाळा जो जो रे ,जो।।११।।

लाल बहादूरांचे नेतृत्व गुण 

एकोणावीसशे पासष्टचे रन ।

पाकला सेनेने नमविले छान

जो बाळा जो जो रे ,जो ।।१२।।

सन एकोणावीसशे सहासट

उघडला जगत सुंदरीचा पट।

रिटा फारिया सौंदर्य वती धीट

जो बाळा जो जो रे ,जो।।१३।।


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Classics