अमृत महोत्सवी पाळणा (एकत्रित)
अमृत महोत्सवी पाळणा (एकत्रित)
साडेसात दशकांचा मेळा
सुर्य चंन्द्र झाले ते गोळा ।
अमृत महोत्सवी हाले पाळणा
जो बाळा जो जो रे ,जो ।।धृ।।
पहिल्या दशका पहिला मान
सोनेरी अक्षरी चढवू कमान।
सरदार वल्लभा देऊ तो मान
जो बाळा जो जो रे,जो ।।१।।
दुसर्या दशका दुसरे मोल
बाबासाहेब नि शास्त्रींचा लाल।
डॉक्टर राजेंद्र प्रसादा शाल
जो बाळा जो जो रे ,जो।।२।।
तिसर्या दशका तिसरी माळ
इंदिरा गांधींचे दिसले बळ।
देश रांगणे चा असे तो काळ
जो बाळा जो जो रे ,जो ।।३।।
चवथ्या दशका चवथी कोर
आशियाई स्पर्धे
चा नाचला मोर।
विश्वचषक हाती नाचे हातभर
जो बाळा जो जो रे ,जो।।४।।
पाचव्या दशका पाचवी भर
खाजगी,उदारीकरन जग भर।
राव, मनमोहन लावती जोर
जो बाळा जो जो रे ,जो ।।५।।
सहाव्या दशका सहावे दान
अटल विश्वासाचे अटल पान।
दृढ दुरदृष्टी चे अभंग गाण
जो बाळा जो जो रै ,जो ।।६।।
सातव्या दशका सातवे उड्डान
बजरंगा समान उडे अंतराळ यान ।
चन्द्रयान एकचे गाऊ गुणगान
जो बाळा जो जो रे ,जो।।७।।
आठव्या दशका मोदींचे भान
जगी उंचविली देशाची मान।
पायाभूत सुविधा नितीन कमान
जो बाळा जो जो रे ,जो।।८।।