STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

अमृत महोत्सवी पाळणा.(भाग ६)

अमृत महोत्सवी पाळणा.(भाग ६)

1 min
198

साडेसात दशकांचा मेळा

सुर्य चंन्द्र झाले ते  गोळा ।

अमृत महोत्सवी हाले पाळणा

जो बाळा जो जो रे ,जो ।।धृ।।

सहावे दशकाचे प्रथम वर्ष 

दैवगोडा नि इंद्रकुमारा हर्ष ।

टांगीत टांग झाला संघर्ष 

जो बाळा जो जो रे ,जो ।।१।।

सन एकोणावीसशे अठ्ठयान्ऊ

प्रबळ दावेदाराची मिठाई खाऊ।

अटलजींची अटल दुरदृष्टी घेऊ

जो बाळा जो जो रे ,जो।।२।।

एकोणावीसशे नव्व्यान्ऊचे सालं

"आँपरेशन विजय " विजयी झालं।

'सिमला करार'मोडीत पाकची भुलं 

जो बाळा जो जो रे ,जो ।।३।।

चोवीस डिसेंबर होता तो दिन 

नव्व्यान्ऊचे कदांहार अपहरन।

सोडावी लागली दहशतवादी तीन 

जो बाळा जो जो रे ,जो ।।४।।

दोन हजार एक सालाला

अफजलगुरुने कट रचिला ।

संसदेवर हल्ला तो केला

जो बाळा जो जो रे ,जो।।५।।

दोन हजार  दोन  सालाला 

कर सेवकांचा ताफा निघाला ।

गोधरा येता अग्निकांड झाला

जो बाळा जो जो रे ,जो ।।६।।

दोन हजार दोन सालाला

राज्य माहिती आयोग आला।

अण्णा हजारेंना सलाम झाला 

जो बाळा जो जो रे ,जो ।।७।।

दोन हजार पाच सालाला

बारा आक्टोबर या मुर्हताला ।

केंद्रीय माहिती कायदा आला

जो बाळा जो जो रे ,जो।।८।।

दोन हजार सहा सालाला

भारत अमेरिका नवी दिल्लीला ।

नागरी अणू करार झाला 

जो बाळा जो जो रे ,जो।।९।।


Rate this content
Log in