STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

अमृत महोत्सवी पाळणा (भाग ८)

अमृत महोत्सवी पाळणा (भाग ८)

1 min
211

साडे सात दशकांचा मेळा

सुर्य चंन्द्र झाले ते  गोळा ।

अमृत महोत्सवी हाले पाळणा

जो बाळा जो जो रे ,जो ।।धृ।।

 दोन हजार सतराची देन

वस्तू नि सेवा कर नियमन।  

एक जुलैला एक कर छान 

जो बाळा जो जो रे ,जो ।।१।।

पुढे सन दोन हजार अठरा

सहा सप्टेंबर होता तो वार । 

समलैंगिकता गुन्हा नाही बरं

जो बाळा जो जो रे ,जो।।२।।

सहा आँगस्ट ला टाकली कात

अनुच्छेद तीनशे सत्तर मात ।

दोन हजार एकोणावीस

 जातं

जो बाळा जो जो रे ,जो ।। ३।।

ब्युरो चीफ अजितांची होती साथ 

अमित शहांनी दिला तो हाथ।

जम्मु कश्मिर नि लडाख होतं 

जो बाळा जो जो रे ,जो।।४।।

याच वर्षी न्ऊ नोव्हेंबरला

राम मंदिरा चा निकाल आला।

श्री राम जय राम जय जय बोला

जो बाळा जो जो रे ,जो।।५।।

उजाडले दोन हजार वीस

करोना टाळेबंदी ही खास।

जीव वाचविल्याची ही आस

जो बाळा जो जो रे ,जो।।६।।

दोन हजार आले एकवीस

कोवीड प्रतिबंधक लस ।

सोळा जानेवारी प्रारंभ खास

जो बाळा जो जो रे ,जो।।७।।

पुढे सन दोन हजार बावीस

श्रीराम मंदिर भूमी पुजनास ।

पाच आँगस्टला फेडला नवस

जो बाळा जो जो रे,जो।।८।।


Rate this content
Log in