STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

अमृत महोत्सवी पाळणा (भाग ३)

अमृत महोत्सवी पाळणा (भाग ३)

1 min
139

साडेसात दशकांचा मेळा

सूर्य चन्द्र झाले ते गोळा ।

अमृत महोत्सवी हाले पाळणा

जो बाळा जो जो रे ,जो ।।धृ।।

सन एकोणावीसशे सदूसष्ट

फळा आले रविशंकर कष्ट ।

पंडित संतूर वादन 'ग्रँमी' निष्ट

जो बाळा जो जो रे ,जो।।१।।

सन एकोणावीसशे अडूसष्ट 

अणुचाचणी जगता नाही इष्ट।

इंदिराने दिला नकार स्पष्ट

जो बाळा जो जो रे ,जो।।२।।

सन एकोणावीसशे एकोणसत्तर

जनाभिमुखी कृतिशिल उत्तर।

इंदिराजींचे बँक राष्ट्रीय अंत्तर

 जो बाळा जो जो रे ,जो ।।३।।

त्याच वर्षी पंधरा आँगस्टला

अवकाश संशोधन " इस-त्रोला"।

विक्रम साराभाई हीरा लाभला

जो बाळा जो जो रे,जो ।।४।।

पुढे सन एकोणावीसशे सत्तर

"श्र्वेत क्रांती"झाली ती बेहत्तर ।

डॉक्टर वरगिस कुरेन मास्तर

जो बाळा जो जो रे ,जो।।५।।

पुर्व पाकिस्तान बांगला मुक्ती

मुक्तिबाहिनीच्या नांवे युक्ती ।

सोळा डिसेंबर एकाहत्तर सक्ती

जो बाळा जो जो रे ,जो ।।६।।

सन एकोणावीसशे बाहत्तर

भारत बांगला घट्ट मैतर।

इंदिरा नि शेख रहेमान खर 

जो बाळा जो जो रे ,जो ।।७।।

सन एकोणावीसशे त्र्याहत्तर 

चिपकोचे चंडी प्रसाद सुत्र- धार

भट्टा नंतर बहुगुणा चा भार

जो बाळा जो जो रे ,जो ।।८।।

"स्मायलिंग बुद्धा " स्वयंसिद्ध

सन एकोणावीस चौर्याहत्तर।

भारत पोखरण  अणु अस्त्र 

जो बाळा जो जो रे ,जो।।९।।

महान गणित तज्ञ आर्यभट्ट

त्यांचे नावे केला उपग्रह हट्ट ।

एकोणावीसशे पच्याहत्तर घट्ट

जो बाळा जो जो रे ,जो।।१०।।

सन एकोणावीसशे पच्यांहत्तर 

ठोकशाही आणिबाणी कट्टर ।

लोकशाही स काळे जतंर मंतर 

जो बाळा जो जो रे ,जो।।११।।

सन एकोणावीसशे छ्याहत्तर

संजयांचा वादग्रस्त पुढाकार ।

सामूहिक नसबंदीचे चाले हंटर ।

जो बाळा जो जो रे ,जो ।।१२।।


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन