कोडगा
कोडगा
1 min
192
तरारलं बीज
कुशीतुन माते
सरीताची काज
उभारती।।धृ।।
शेकारली किती
कुश ह्द्यी ज्योति
पळसाची पाती
शीवताती।।१।।
उभ्या उभ्या अशा
शेंदतात कशा
पोहर्याच्या राशी
ओतताती।।२।।
जीव येडा पीसा
तगमग असा
वर खाली जसा
टांगताती।।३।।
जग जग म्हणे
रात्र दिन गाणे
जाते ते तराणे
ओढताती।।४।।
जीव कोडगाची
होई रोडगाची
रीत जगण्याची
भरताती।।५।।
