कुंकू
कुंकू
- लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी
- साहेबांचा फोन आला
- सिमेवर चकमक सुरू झाली
- आणि मी लगेच निघालो
- जाताना मागू वळून बघण्याची हिंमत झाली नाही
- ती तशीच धावत आली
- पाठीमागून मिठी मारली
- परत कधी येणार म्हणून
- विचारू लागली
- सांगता आले नाही
- पण....
- तिच्या पदराला परत येण्याच वचन बांधून
- एक मात्र निश्चित सांगितले
- परत आलो तर पुन्हा
- तुझ्या कपाळाला कुंकू लावीन
- तुझ सौभाग्याच रूप
- डोळे भरून पाहीन
- मी येईपर्यंत कुंकू सांभाळून ठेव
- वर्ष निघुन गेले ती तशीच
- कुंकू जपून वाट पहात होती
- मी जेव्हा परत आलो तेव्हा
- तिच्या पदराला बांधलेली
- वचणांची गाठ सोडली
- आणि लावले तिने सांभाळून ठेवलेले कुंकू
- तिच्या कपाळाला
- आताकुठे मुलगा मोठा झाला
- बापाशी बोलायला लागला
- अशातच साहेबांचा फोन आला
- सिमेवर चकमक सुरू झाली
- आणि पुन्हा मी तसाच निघालो
- काही न बोलता
- पण मागे वळून पाहू शकतं नव्हतो लेकराला
- पोरगा तसाच धावत आला
- पायाला बिलगला
- आणि म्हणाला
- बाबा तुम्ही जावूच नाका
- म्हणजे आईला पाढंर कपाळ करून
- आरशात बघावं लागणार नाही
- कारण तुम्ही गेल्यावर
- आई स्वतःच्या जीवापेक्षा
- कुंकू जपुन ठेवते
- दारात उभी राहुन
- तुम्ही येण्याची वाट बघते
- अश्र डोळ्यातून येवू न देता
- मुलाला मिठीत घेवून सांगितले
- तुला जशी आईची गरज आहे
- तशीच भारत मातेला माझी गरज आहे
- परत आलो तर
- भारत मातेच्या कपाळाचे कुंकू
- तुझ्या आईच्या कपाळी लावणार
- त्यानंतर घरात आरसा
- कधीच नाही दिसणार
