।।शिवराय।।
।।शिवराय।।
भक्ती आणि युक्तीचा संगम होता
दीन जनांच्या ह्रदयाचा ठोका होता
स्वराज्याचा महामेरु होता ।।
शत्रुंचा कर्दनकाळ ठरला
धर्म रक्षणाकरीता दैवी अवतार जन्माला आला
जिजाऊंचा छावा म्हणून नावाजलेला ।।
गनिमी काव्याचा असे जन्मदाता
युगांयुगे तेजस्वी तार्यांसम किर्तीची गायली जाईल गाथा
शिवराय नाव असे झुकतो त्यांच्यापुढे हा माथा।।
स्वराज्याच्या कणाकणातून मनामनातून एकच नाद घुमला
मावळ्यांच्या रक्ताने,शिवरायांच्या प्रेरणेने भगवा येथे फडकला
छत्रपती शिवरायांच्या कार्याने महाराष्ट्र माझा तरला।।
