STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational Others

4  

Trupti Naware

Inspirational Others

निर्णय

निर्णय

1 min
27.4K


निर्णय चुकत होता

की घेता येत नव्हता

कोणाला सांगावे तर

विश्वास बसत नव्हता

दमछाक होत होती विचारांची

कोंडी झाली होती हो-नाहीची

प्रत्येक पाऊल बरोबर होते

येणाऱ्या संधीच्या वाटेवर

पण वाटेतल्या मरगळीत दबायचे

दडपणाच्या ओझ्यावर

भार सहन होत नव्हता

की सहनशक्तीच नव्हती

कुणाकडे तक्रार करावी

माणुसकीही दिसत नव्हती

आनंदाच्या शोधात होते

पण माहीतच नव्हते

आनंदासोबत मनस्तापाचे

फार जुने नाते होते

निर्णय तर घ्यायचा होता

कारण वेळ फार कमी होता

कमी वेळात योग्य निर्णय घेण्याची

ही एकच संधी होती

शेवटी ठरवले करायचे

जे मनाला पटत होते

मनःपटलावर आता

आशेचे ढग दिसत होते

भिजायचे की रडायचे पावसात

हेच ठरत नव्हते

हीच ती कठीण वेळ

पाऊल न वाजवता येणाऱ्या

वादळाची होती

अखेर वाट निर्णयाची

पुर्णत्वास जात होती

कारण ,रडले तरी डोळे ओले

नि भिजले तरी डोळ्यात धार होती ...!!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational