STORYMIRROR

Rajesh Sabale

Inspirational

4  

Rajesh Sabale

Inspirational

।। घन गर्जत येती।।

।। घन गर्जत येती।।

1 min
28.3K


ढग पांढुरके निळे सावळे, घन गर्जत येती।

आला पाऊस असला पाऊस, मेघ आरोळ्या देती।।


इंद्रधुनची कमान करुनी, सप्तरंगाची उधळण करती।

बिजली नाचे भान हरपुनी, मेघ सुरांचे गायन करती।।


कडे कपारी आवाज घुमती, धुली कणांचे लोट उसळती।

ढवळून निघत आसमंत हा, थर थर धरा कापती।।


झर झर झरतो, मेघ अंबारी, थेंबांचे अश्रू होती।

सर सर येता धरतीवरती, गिरीशिखरे नाहती।।


चार दिसांनी धरणीवरती, नवं तरुणी आवतरती।

हिरव्या हिरव्या गालिच्यावर, रानफुले हसती।।


हिरवे डोंगर हिरवी राने, ओहळ मंजुळ गाती गाणे।

झाडावरती किलबिल करती, पक्षी सुस्वरे गाती गाणे।।


रंगी बेरंगी फुल पाखरे, इकडून तिकडे उड्या घालती।

अंबरातले ढग सोनेरी, खुदकन आपल्या गाली हसती।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational