STORYMIRROR

Rajesh Sabale

Classics

3  

Rajesh Sabale

Classics

श्रावणातील व्रत वैकल्ये

श्रावणातील व्रत वैकल्ये

1 min
228

या गं श्रावण मासात, ऊन पावसाच्या सरी!

माहेराला येता जाता, ओल्याचिंब झाल्या पोरी!!


या गं श्रावण मासात, सण उत्सव जोरात!

झोका झाडाला बांधून, घेते झोका मी जोसात!!


या गं श्रावण मासात, नागपंचमीचा सण!

लाह्या दुधाचा नैवद्य, हेच नागोबाचं वाण!!


या गं श्रावण मासात, येते प्रेमाला भरते!

लेक सासुरवाशीण, गोष्टी प्रेमाच्या मोसांगते!!


या गं श्रावण मासात, खेळ दारात रंगतो!

माय लेकीच्या प्रेमाचा, दारी भोंडला रंगतो!!


या गं श्रावण मासात, लेक माहेरीस येता!

येते आनंदा भरते, मंगळागौर सजता!!


या गं श्रावण मासात, रक्षाबंधनाची आस!

राखी बांधते भावाला, बहीण रेश्माची खास!!


या गं श्रावण मासात, येता नारळी पूनव!

दर्या नारळ सोन्याचा, देई कोळी गं बांधव!!


या गं श्रावण मासात, बैलपोळ्याचा गं सण...

बळीराजा फेडतसे, मुक्या जीवाचे गं ऋण...


या गं श्रावण मासात, कृष्णाष्टमीचा गं सण!

बाळकृष्ण जन्म घेता, येते आनंदा उधाण!!


या गं श्रावण मासात, दहीहंडीची धमाल!

चढे थरावर थर, सान-थोरांची कमाल!!


या गं श्रावण मासात, एका मागे एक सण!

राजा श्रावण सणांचा, जाते मन आनंदून!!


या गं श्रावण मासात, धरा सुंदर दिसते!

शालू नेसता हिरवा, नवी नवरी वाटते!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics