बंध रेशमी
बंध रेशमी
करून दीप हृदयाचा
वळल्या मायेच्या वाती
ओवाळते भाऊराया
राखी बांधून तव हाती
माथी विजयतिलक
नंतर औक्षण आयुष्याचे
आण रक्षणाची देऊन
बंध बांधते सौख्याचे
नाते आपले अलवार
रेशमी धाग्यावर उमलले
बंधन अतूट मायेचे
हृदय स्पंदनी उमटले
तुला ओढ ती लावेल
दृढ बंध हा राखीचा
असेल हाच रे उपहार
तुझा माझ्यासाठीचा