STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Romance Tragedy

आता पुरे

आता पुरे

1 min
205

सोबतीने तारकांच्या, जागणे आता पुरे

रोजच्या या वेदनांना, सांधणे आता पुरे


मिथ्य सारी प्रीत अन्, ही झूठ सारी बंधने

ताज हे नावे प्रियेच्या, बांधणे आता पुरे


वाट नाही ओळखीची, ना कुणीही आपले

सोबती येईल कोणी? पाहणे आता पुरे


सांज पाठी राहिली अन्, दाटला अंधार हा

सावल्यांच्या पाळतीला, चालणे आता पुरे


मोजक्या काही खुणा, आहेत बाकी आपल्या 

भूतकाळातून त्यांना, वेचणे आता पुरे


दूर जा सारे मला, एकांत आहे पाहिजे

चंद्रही आता नकोसा, चांदणे आता पुरे


जी अखेरी राहिली, आहेत माझ्या सोबती

लाघवी पत्रे तुझी त्यां, वाचणे आता पुरे


राजसत्ता द्या पुन्हा, आम्ही सुधारू भारता

या गुलाबी भाषणांवर, भाळणे आता पुरे


तू दिलेल्या वेदनांना, खोल हृदयी राहू दे

आसवे होऊन त्यांचे, वाहणे आता पुरे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance