STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Abstract Romance

2  

Sakharam Aachrekar

Abstract Romance

ये प्रिये आता तरी

ये प्रिये आता तरी

1 min
113

प्रीत ही रंगात आहे, ये प्रिये आता तरी

चांदणे बहरात आहे, ये प्रिये आता तरी


या दिशा अंधारल्या अन्, लोपले सारे दिवे

रात्रही स्वप्नात आहे, ये प्रिये आता तरी


चार दिवसांचेच आहे, प्राक्तनी आयुष्य या

दो क्षणांची बात आहे, ये प्रिये आता तरी


पांघरूनी झोपले, सारे सुखाची ओढणी

मी इथे दुःखात आहे, ये प्रिये आता तरी


काल होती आठवांची, रंगली मैफिल जुनी

आज हा एकांत आहे, ये प्रिये आता तरी


चांदणे तुज साद घाली, चंद्रही सांगे तुला

हर्ष गाणे गात आहे, ये प्रिये आता तरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract