खोडकर कान्हा
खोडकर कान्हा
वर्णसंख्या १६
नंदाचा कान्हा वेड लावतो साऱ्या गोकुळाला
कुणी तरी अडवा खट्याळ कृष्णकन्हैय्याला // ध्रु //
खोड्या करी सदाच कान्हा गोकुळी खेळताना
गोपींना अडवी घागरींना मारतो खड्यांना
खट्याळ भारी येई कसा आडवा नंदलाला
कुणी अडवा गं खोडकर कृष्णकन्हैय्याला (१)
मुरली नादे धावतसे राधा सोडूनी काम
सदाच हिच्या मुखात असे हरीचेच नाम
गोकुळ नादावले विसरुनी जाती भानाला
कुणी अडवा गं खोडकर कृष्णकन्हैय्याला (२)
उखळ घेऊन धावतो, उखळासी बांधला
नदीतीरी गोपींची वस्त्रे लपवी द्वाड मेला
भला मोठा लोण्याचा गोळा हळूच पळविला
कुणी अडवा गं खोडकर कृष्णकन्हैय्याला (३)
नंदाचा कान्हा हा वेड लावी साऱ्या गोकुळाला
कुणी अडवा गं खोडकर कृष्णकन्हैय्याला // ध्रु //