स्त्री - सहनशीलतेची मूर्ती
स्त्री - सहनशीलतेची मूर्ती
स्री सहनशीलतेची मूर्ती
दुस-यासाठी सदा सोसते
जीवन तिचे सर्वांच्या साठी
स्वार्थ तिजला कधी न ठावे (1)
माहेर सोडून सासरला
येते अन् घेते अंगावरी
जबाबदाऱ्या कष्ट सोसते
ही आपलीच माणसे सारी (2)
कौतुकाने कोणी बोले तिज
कोणी टोमणे देई तिजला
ऐकूनिया सोडून देतसे
कर्तव्य श्रेष्ठ म्हणे मजला (3)
पती मुले नि सासू सासरे
सर्वांना समजावून घेई
कामा तत्पर त्याग करिते
सौजन्याची प्रेमळ माऊली (4)
इतरांसाठी नित झटताना
विरुन जाई तिचे मी पण
कांचनसंध्येमधे आनंदी
सोशिकता किती मोठा गुण (5)