संकल्पसिद्धी
संकल्पसिद्धी
स्वागत करु नववर्षाचे
प्रथम वंदन गणेशाला
देई शक्ती नि बुद्धिसंपदा
गती मिळो संकल्प सिद्धिला
वर्षारंभी दाटी संकल्पांची
ध्यास कुणाचा समाजाप्रती
गरजूंना जाणून घेऊनी
तृप्त करिती दान देऊनी
देऊ हात अनाथ दीनांना
करु जीवन सुकर त्यांचे
भुकेल्यांना अन्न देऊनिया
तृप्त करुयात क्षुधाब्द्धिते
परोपकारार्थ संकल्पांची
करु पूर्तता तत्परतेने
कुणी बेघर , कुणी उपाशी
हात मदतीचा मानवतेने
एक विनवणी वर्षारंभी
परमेशा तुजला करते
शक्ती बळ उर्जा देऊनिया
यश द्यावे संकल्पसिद्धिते