आदर्श घर
आदर्श घर
1 min
127
घर असू दे लहान
मन असावे विशाल
अतिथीचा ठेवा मान
त्यास पुसावे कुशल
नको बोजवारा कधी
नको आस श्रीमंतीची
आहे तयात रहावे
सुखी आस अंतरीची
घर असावे घरासारखे
समजूनी घ्यावे सकला
नको कलह कधीच
शांती नांदू दे सर्वदा
समाधान हाच पाया
असे छप्पर प्रेमाचे
एकमेकां लावी माया
चित्र आदर्श घराचे