निरोप घेता घेता
निरोप घेता घेता
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
उदास होई , मन पाखरु
नेत्र लागले , अता पाझरु
कैसे सखये , मना सावरु
घेते निरोप , नका विसरु
शब्दा शब्दा , मनी जुळवले
प्रभू कृपेने , काव्या रचले
गोड मानुनी , घ्या चुकलेले
घेते निरोप , डोळे भिजले
आठवणींच्या , हिंदोळ्यावर
झुलले , डुलले , वा-यावर
झुळुक सुखाची , अंगावर
घेते निरोप , जोडूनी कर
क्षमायाचना , आता शेवटी
मनी शब्दांची , जमली दाटी
पदरी घ्याव्या , चुका शेवटी
घेते निरोप , होतील भेटी
कैसे आभार , मानू तुमचे
कृतज्ञता मी , व्यक्त करते
सत्य सुदैवे , मैत्र लाभते
भाग्यवती मी , निरोप घेते