हे मृत्यो
हे मृत्यो
सरणावरही जेव्हा,
सुचली होती कविता
वाहत होता मंद वारा
अवचित कोसळल्या पाऊसधारा
पळून गेला सगळा
आयुष्याभराचा थकवा
किंचितसाही उरला नव्हता अहंकार दूर झाला
मृत्यू चा गैरसमज सारा
माझ माझ अस काही उरलंच नव्हत
मृत्यूने मला जेव्हा कवटाळले होतं.
घेऊन सगळे सोबत वारा,पाणी ,माझी माती खरया अर्थाने समजली होती
तुमची माझी जन्मोजन्मीची नाती
हे ,मृत्यो,
तुझ्या असण्यानेच आयुष्याला खरा अर्थ आहे तुझा विचारही नसेल तर आयुष्य जगणं व्यर्थ आहे.
