जन्मदिन
जन्मदिन


जन्मदिनी प्रभू लावे
एक सुंदर रोपटे
माया ममता वात्सल्य
सदा तयाने बहरे
संस्कारांचे खतपाणी
नित्य तया मिळतसे
कष्ट जोम उत्साहाने
सदा बहर येतसे
कला शिक्षण विद्वता
दान मिळे उचितसे
शुभेच्छांचे सदिच्छांचे
कोंदणही लाभतसे
गंध सुरेल स्वरांचा
दशदिशा व्यापतसे
कीर्ती यश नि स्तुतीने
हळुवार डोलतसे
इवलेसे रोप आता
यश कीर्तीने वर्धले
विनय संयम ह्यांनी
नच धरेस सोडले
खूप खूप शुभेच्छांची
काव्यसुमने बहरो
दीर्घायुरोग्य सन्मान
स्वर सहवास लाभो