STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

माझ्या स्वप्नांच्या नगरीत

माझ्या स्वप्नांच्या नगरीत

1 min
163

माझ्या स्वप्नांच्या नगरीत

एकदा धबधबे कोसळले

पाणी त्यांचे सगळीकडे 

 खळखळाटाने उडले


मजा वाटली मला खूप 

 चिंब पाण्यात भिजताना

 वाटले आश्चर्य मनाला

कुठे जाते पाणी वाहताना?


खेड्यात भगिनी माझ्या

करती पाण्यासाठी वणवण

थोडे त्यांच्याकडे पाठवावे

टाळण्यासाठी चणचण


बाबाला सांगताच आल्या

त्याच्या डोळ्यांत गंगायमुना 

जवळ घेऊन प्रेमाने म्हणाला

जाण बाळा असेच दुःखांना


जाग आली तेव्हा कळले

स्वप्नच मला रात्री पडले

आई म्हणाली बाळ गुणी

दुस-याचे दुःख जाणले



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract