रहा आनंदी
रहा आनंदी


जन्म लाभलासे मनुजाचा
सार्थक करावे जीवनात
नकोच हिरमुसलेपण
आनंदी समाधानी मनात
कुणी दिव्यांग मूक बधिर
क्षितीजापार सहजपणे
विनातक्रार नि कुरबूर
फक्त ध्येयासाठीच लढणे
एका मुठीत नसे लाभत
सर्वसुखे कुणालाही जगी
कुणी गिळून दुःख वेदना
सदा हसतमुख जीवनी
प्रभूकृपेने सुखी रहावे
नकोच हाव स्पर्धा तुलना
पोटापुरते देई विठ्ठला
हेच मागणे देवा तुजला