स्वर
स्वर
गळ्यामधले वाद्यामधले
सूर एकवटती
सुस्वर सुगम गानाचे
कानी रुणझुणती
कधी मंद्र तर कधी तार
सप्तक कानी येई
मध्य सप्तकात शिरता
सम जागीच येई
गेला काळ विरघळूनिया
मम समाधी लागली
भैरवीच्या आर्त सुरांना
आसवांनी दाद दिली
वेडे गायक वेडे वादक
एकरुप संगीताशी
रसिकही गानवेडे असे
वन्स मोअर देती
उलटून जाई रजनी
उषःप्रभा गगनी
स्वराभिषेक संपूनिया
रसिक तृप्त मनी