STORYMIRROR

Sandesh Kardak

Classics Others

3  

Sandesh Kardak

Classics Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
60

ओसाड झाल्या रानमाळाला, 

त्या रानमाळातल्या मोराला, 

कोरड्या पडल्या दऱ्याखोऱ्याला,

तळाशी गेल्या अंगणातल्या विहिरीला, 

ओढ पावसाची...


चातकाच्या इवलाश्या चोचीला,

चिऊताईच्या घरट्याला, 

फुलातल्या दरवळणाऱ्या सुगंधाला, 

फुलपाखरांच्या रंगीबेरंगी रंगाला,

ओढ पावसाची...


मातीत खेळणाऱ्या लेकराला, 

तारुण्यात बहरलेल्या प्रेमाला, 

उन्हात बेजार झाल्या देहाला, 

खळखळणाऱ्या डोंगरावरच्या धबधब्याला, 

ओढ पावसाची...


रस्त्याकडेच्या झाडाच्या मुळाला, 

घरावरच्या धुळीने माखल्या छपराला, 

मातीतून उठल्या सुवासाला, 

अन् कोकीळेच्या सुमधुर गाण्याला, 

ओढ पावसाची...


आभाळाकडे पाहणाऱ्यात शेतकऱ्यांच्या डोळ्याला, 

उन्हात भेगाळलेल्या काळ्यामातीला, 

देहाची लाही झाल्या गोठ्यातल्या गाईला, 

अन प्रत्येक कवींच्या कल्पनेतील शब्दाला 

ओढ पावसाची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics