जुन्या वाटा
जुन्या वाटा


गावाकडच्या जुन्या वाटा
आठवतो आठवांचा साठा
शाळा संपल्यावर वाटेत
सायकलांची शर्यत लागायची
लगबगीने घरी जाऊन
खेळासाठी टीम गोळा व्हायची
वडा-पिंपळाला फेऱ्या मारून
चिंचा दगड मारून तोडायच्या
चिंचा खाऊन चिंचोक्याचा खेळ
खूप वेळ चालायचा
लपाछपीचा खेळ खेळून
सांजवेळी घराला परतायचं
मनसोक्त बिनधास्त जीवन
निखळ निरागस मैत्री ती
जुन्या वाटेवर आठवायची.....
समजदार झालो आता कॉलेजला गेलो
एकत्र खेळणारी मुला-मुलींची टीम
दोन विभागात वाटली गेली
लहानपणाची ओळख तरी
कोणी कोणाशी बोलले नाही
समाजाच्या भीतीने की, विसरली
लहानपणातील मैत्री, मनाला काही कळले नाही
नवीन मित्र-मैत्रिणीत सगळे दंग आता
तरी आठवते त्या जुन्या गावाकडच्या वाटा...