येरे येरे पावसा
येरे येरे पावसा


येरे येरे पावसा
वाट पाहतो उन्हात दिवसा
उगवले कोवळे बी जमीनीच्या पोटातून
दोन हात वर करून
वाट बघतेय रे तुझी
त्याले जगवाले
येरे येरे पावसा.......(1)
ईलुस बी ईलुसाच जीव
उन्हाच तापमान जिवाच्या पार झालय रे आता
चीमुन पडलय रे जमीनीवर
जीव तुटतोय रे बळीराज्याचा माझ्या
मोठ्या कौतीकान लावलय रे त्याला
माऊली बाप तो कोवळ्या जीवांचा
आस लावुनी वाट बघतोय रे तुझी
उन्हाचे चटक
े लासवु नको रे भर दिवसा
येरे येरे पावसा.........(2)
तुझ्याच आशेवर अवलंब माझा
भूईवर जिव मुके पडले दशा पाहून
शेतकर्याचे डोळे रडले
ओलतीचे डोळे आभाळाकडे बघून,
वाट बघतोय रे तुझी
येरे येरे पावसा..........(3)
जीवांच्या वेदनेन मनही व्याकुळ झाल
उन्हाच्या घामान शरीरही न्हाऊन गेल
कष्टाचा घाम उतारून शरीराला थंडक दे
कोमेजलेल्या जीवाला जगण्याच नव बळ दे
मन ठकल विचारांनी भर दिवसा
येरे येरे पावसा......(4)