बी आणि मी
बी आणि मी

1 min

30
ओली माती त्यावर सुरेख रेषा
बी हाताने टाकून झाकतो आहे
ओली माती.........(1)
ओल्या मातीचा मंद मंद
घेत सुगंध लपली आहे
बी आणि बी त्या
सुरेख रेषेमध्ये........(2)
काही दिवस विश्रांती घेऊन
येईल वेष बदलून नव्याने वर
मला बघायला येशील तू
जणू ती मला सांगते आहे
रेषे रेषेत लपून
बी आणि बी बसली आहे......(3)
वाऱ्याशी खेळत इथे
मला मोठं व्हायचं आहे
मला इथेच फळा-फुलायचं आहे
इथेच काडी बनून कुजायचं आहे
येशील ना मला बघायला
जणू ती मला सांगते आहे
रेषेत रेषेत लपून
बी आणि बी बसली आहे......(4)