STORYMIRROR

Gayatri Zade

Others

4  

Gayatri Zade

Others

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा

1 min
60

येरे येरे पावसा 

वाट पाहतो उन्हात दिवसा 

उगवले कोवळे बी 

जमीनीच्या पोटातून

दोन हात वर करून वाट बघतेय रे तुझी 

त्याले जगवाले

येरेे येरे पावसा......(1)

ईलुस बी ईलुसाच जीव 

उन्हाच तापमान जिवाच्या

पार झालय रे आता

चीमुन पडलय रे आता जमीनीवर 

जिव तुटतोय रे बळीराज्याचा माझ्या 

मोठ्‌या कौतिकान लावलय रे त्याला 

माऊली बाप तो कोवळ्या जीवांचा 

आस लावुनी वाट बघतोय रे तुझी 

उन्हाचे चटके लासवू नको रे भर दिवसा

येरे येरे पावसा.......(2)

तुझ्याच आशेवर अवलंब माझा 

भूईवर जिव मुके पडले 

दशा पाहून शेतकर्‌याचे डोळे रडले 

ओलतीचे डोळे आभाळाकडे बघून

 वाट बघतोय रे तुझी 

येरे येरे पावसा......(3)

जिवांच्या वेदनेन मनही व्याकुळ झाल 

उन्हाच्या घामान शरीरही न्हाऊन गेल 

कष्टाचा घाम उतारून शरीराला थंडक दे

कोमेजलेल्‌या जिवांनां जगण्याच्य नव बळ दे 

मन ठकल विचारांनी भर दिवसा 

येरे येरे पावसा........(4)

तू हळुवार ये,पळत ये ,रडत ये, 

गडगडत ये,गुपचूप ये 

वाट बघतेय कोमेजलेले जीव 

मोकळ्या हवेत खेळण्यासाठी 

टाळ्या वाजवून करेल तुझ स्वागत 

उन्हा पााासून सुट्टी दे एक दिवसा.....

येरे येरे पावसा........(5)

..........................गायत्री झाडे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन