STORYMIRROR

अक्षता कुरडे

Romance Classics Others

3  

अक्षता कुरडे

Romance Classics Others

कोसळणाऱ्या पावसात

कोसळणाऱ्या पावसात

1 min
44

तप्त झालेल्या मनाच्या कोपऱ्यात

प्रेमाचा ओलावा जाणवेल..

जेव्हा सुखद पाण्याचे थेंब

आपल्या अंगावर बरसेल...


नको बाळगू तमा जगाची

तुझ्या सोबतीने मलाही भिजू दे..

वेळ निसटून जाण्या अगोदर 

क्षण हे मनमुराद जगून घे...


होतील आज पुन्हा ताज्या

प्रेमाच्या गोष्टी आठवणीतल्या..

आज म्हणू नकोस प्रियकरा

नात्याला दे बहरू आपल्या...


हात धरलास घेऊन तुझ्या मिठीत 

नव्याने शहारे येताच..

भिजून गेलो प्रितीच्या ह्या

चिंब कोसळणाऱ्या पावसात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance