ते दिवस
ते दिवस
शाळेतील ती दंगा मस्ती अन् मोडायचो खोड
उरणार नाही भान वेळेचे अश्या आठवणी त्या आंबटगोड..
शाळेत मारायची कशी दांडी तेव्हा दबदबा फार असायचा,
नवीन युक्त्या केल्या कितीही प्लॅन नेहमी फसायचा..
शाळेतले शिक्षक सारे तेव्हा हिटलर वाटू लागे,
गळाभेट होताच आता अश्रू थांबता न थांबे..
होताच एन्ट्री त्यांची वर्गात होऊन जाई मी गार,
यशस्वी माझ्या होण्याला ह्यांचाच वाटा फार..
अभ्यास पुस्तकाची बाबा भारी भीती वाटे,
आता ह्या मनाला ही त्यांचीच ओढ लागे..
गेलो होतो घेऊन शाळेत मी पाटी माझी कोरी,
जाताना बांधून दिली त्यांनी संस्कारांची शिदोरी..