असा माझा बाबा, आई बनू लागला..
असा माझा बाबा, आई बनू लागला..
लहान असताना माझी आई देवाघरी गेली,
जणू देवबाप्पा ने शिक्षा आम्हाला दिली...
डोंगरा एवढ्या दुःखाला हसत सामोरे गेला,
तेव्हा बाबा माझा हळू हळू आई बनू लागला..
यू ट्यूब वर बघून माझी वेणी घालू लागला..
हातावरच्या चटक्यांना अलगत झेलू लागला..
ओंजळीत माझा चेहरा घेऊन तीट लावू लागला..
जबाबदारी ने तर कधी मायेने वागू लागला..
आई सारखी अंगाई रोज बाबा गाऊ लागला..
रात्री आसवांना मोकळी वाट करत, दिवसा कणखर होऊ लागला,
तेव्हा बाबा माझा हळू हळू आई बनू लागला...