भावना
भावना
1 min
212
भावना, एकमेकांत गुरफटलेल्या,
तरीही कुठेतरी एकाकी पडलेल्या...
भावना, कल्लोळ माजवणाऱ्या,
तरीही निरव शांततेत दबून गेलेल्या...
भावना, अथांग पसरलेल्या समुद्रासारख्या,
तरीही मनाच्या कोपऱ्यात दडपलेल्या...
भावना, मायेने ओथंबलेल्या स्पर्शासारख्या,
तरीही अहंकाराच्या जाळ्यात कुठेतरी अडकलेल्या...
