STORYMIRROR

अक्षता कुरडे

Romance

4  

अक्षता कुरडे

Romance

प्रीत आपुली

प्रीत आपुली

1 min
257


अबोल प्रीत तुझी अन्

आठवे मला ती सर सुखाची...

आपल्या प्रेमाला नाही रे गरज

कोणत्याही ठराविक व्याख्याची...


आपल्या प्रेमळ क्षणांना उजाळा देत

तुझ्या आठवणींत जीव रमवते...

भविष्यातल्या येणाऱ्या दिवसांची

वाट पाहत मीच आपली स्वप्न सजवते...


शरीरे जरी दोन असली तरी

आत्मा नी जीव एकच आहे..

प्रेमाच्या वाटेवर चालत निघालोय ही

प्रीत आपुली अमर आहे...


तुझ माझं असं काहीच नाही

जे काही आहे ते आपलं...

असंख्य संकटांना सामोरे जात

हे प्रेम मी नेहमी मनापासून जपलं... 


Rate this content
Log in