STORYMIRROR

Priyanka Dabhade

Romance Classics

3  

Priyanka Dabhade

Romance Classics

तुझ्यात जीव गुंतला...

तुझ्यात जीव गुंतला...

1 min
161

असे कसे शब्दात मांडायचे

तुझ्याप्रतीचे प्रेम, सावळ्या,

वाहण्या तुज घेऊन आले

मोगऱ्याच्या सुगंधी पाकळ्या...


तुझ्या प्रीतीच्या अंगणी

कितीदा तुझीच वाट बघावी,

सांग ना रे मोहना,

की मीरेसम मीही वेडी व्हावी...? 


फक्त तुझे ओझरते नेत्र तरी

माझ्यावर येऊ दे,

मलादेखील गोपिकांसम

तुझे गीत गाऊ दे...


कशी सोडायची रे,

माझ्या वेड्या मनाची शृंखला

किती सांगायचे रे, 

तुझ्यात जीव रंगला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance