निवांत...
निवांत...
1 min
30
एव्हढ्या धकाधकीच्या जिवनात
मनसोक्त आनंद थोडा हरवला वाटतो ...
इतरांच्या विचारात स्वतःचा
जीव थोडा गुदमरला वाटतो ...
येऊन जाऊन थोडा आनंद मिळाला जरी
तरी तोही काहीसा उसना वाटतो...
सर्वांच्या इच्छापूर्ती नंतर
कधीतरी स्वतःचा लाड पुरवावा वाटतो ..
रोजचे नवे प्रश्न ,नवे विचार, नवी आशा
या साऱ्यात मनाचा आवाज थोडा कमीच वाटतो..
अश्या हिरमुसल्या जीवनात
सुखद क्षणांचा थोडा तुटवडा भासतो ..
म्हणून ,
एक तरी क्षण
निवांत मिळावासा वाटतो...
निवांत मिळावासा वाटतो ...