STORYMIRROR

Priyanka Dabhade

Romance

4.0  

Priyanka Dabhade

Romance

आठवण...

आठवण...

1 min
35


रोज सकाळ त्याच्या आवाजाने व्हायची,

आवाज, मधुर नसला, तरी हवा हवासा होता...


त्याच्या शब्दांनी माझ्या नैराश्याचे निर्मूलन व्हायचे

थोडा खोडकर असला, तरी हवाहवासा होता...


कधी कधी हसून लोटपोट व्हायचो तर,

कधी एकमेकांच्या दुःखात खूप रडायचो 

थोडा जास्तच भावनिक असला, तरी हवा हवासा होता...


कुठे जाण्याचे प्लॅन्स ठरले तर मुद्दाम उशीर करायचा

मग, माझ्या रागाचा पारा आसमंत गाठायचा

थोडा आळशी असला, तरी हवा हवासा होता...


माझ्या, मलाच न कळलेल्या विनोदांवर तो खूप हसायचा

मला आनंदी बघण्या निरर्थक गोष्टी करायचा

थोडा भोळा असला, तरी हवा हवासा होता...


संध्याकाळी चहा घेण्याचा आग्रहदेखील त्याचाच असायचा,

तर, late night जागून movies बघण्याचे प्लॅन्सदेखील त्याचेच असायचे

काही सवयीच्या अधीन गेला असला, तरी हवा हवासाच होता...


आज...

अशा सर्व आठवणी देऊन डोळ्यात पाणी देणारादेखील तोच होता...

हवा हवासा वाटत असला, तरी... जवळ नव्हता...


Rate this content
Log in