नोंद ...
नोंद ...


आठवण येताच अंगावर शहारे यावे अशी ती,
पहिली भेट होती ..
आधीच हात थरथरत होते
शब्द ओठी फुटत नव्हते
आत कुठेतरी ,
नुसता प्रश्नांचा कल्लोळ चालत होता
अश्या भेटीचा मनात विचार सुद्धा नव्हता..
हात घेताच तू हाती त्या सर्व भावना अदृश्य झाल्या
वाहत्या वाऱ्यासम प्रेमाच्या सरी आल्या
हातांचा स्पर्श आणखी दाट होत गेला
हृदयात स्पंदनाऐवजी गाण्याचा नाद सुरू झाला
काही बोलणे अवघड होत होते
आपल्याकडे जणू शब्दसाठेच नव्हते
तू काहीसा बोलत गेला....
माझ्या हृदयाचा कप्पा-न-कप्पा आतुर झाला
तुझा एक-एक शब्द फक्त मनावर गिरवीत गेले
तुझ्याविषयीचे सारे मतभेद मिटवीत गेले
काही क्षणातच स्वतःला हरवून बसले
आता, तुझ्यासाठी बहाणे कसले..?
सांजवेळ होत गेली,
हातांची मिठी सैल झाली..
मिलनास जवळ आलेली हात दूर होत गेले
डोळ्यांच्या किनाऱ्यांखाली आसवे ओघळून आले
बस्स,
एव्हडीच भेट कित्तेक आठवणींना घर देऊन गेली
म्हणूनच या कवितेत तिची नोंद केली..