वारी पंढरीची
वारी पंढरीची
कोरोनाने साऱ्यांची ही
दैना बघा कशी केली
पंढरीच्या वारीचीही
वाट त्याने अडविली
नाही संतांचा तो मेळा
नाही कीर्तन भजन
सुने सुने पटांगण
नाही अश्वाचे रिंगण
पंढरीच्या पांडुरंगा
असे कसे रे जाहले
वारीच्या त्या वाटेवरचे
वारकरी कुठे गेले
सुनी सुनी ती पंढरी
सुनी सुनी चंद्रभागा
डोळ्यांतुनी भाविकांच्या
वाहती यमुना आणि गंगा
जो तो आपल्या घरात
भक्त तुला आळवितो
मुखी नाम तुझे घेतो
नयनी तुलाच पाहतो
पुढल्या वर्षी देवा मात्र
असे नको होऊ देऊ
पंढरीला आम्ही येऊ
डोळे भरुनी तुला पाहू