आले आभाळ भरून
आले आभाळ भरून
1 min
54
आले आभाळ भरून
पण पाऊस पडेना
निसर्गाचे हे अजब
कोडे उलगडेना
का रे रुसला पावसा
काय तुला रे जाहले
वाट पाहुनी पाहुनी
डोळे भरुनिया आले
वाट तुझी पाहतांना
जीव होई कासावीस
तू यावास म्हणुनी
केले नवस सायास
आता बरस बरस
दया दाखव रे जरा
आनंदाने करू दे रे
आम्हा दिवाळी दसरा