गरिबीच्या वणव्यात
गरिबीच्या वणव्यात
गरिबीच्या वणव्यात
बालपण करपून गेलं
किशोर वय कोणाच्या तरी
दावणीला बांधल्या गेलं
तरुणपण पोरांना
खेळवण्यात आणि
त्यांच्या संगोपनात गेलं
यामध्ये मी कधी
तरुण होते हेच
विसरून गेले
आता साठीनंतर
त्याची जाणीव
तीव्रतेने होतेय
गेलेले दिवस परत
आणता येत नाहीत
हेच सत्य आता
समजून घ्यायचं असतं
अन् त्याचं दु:खही
करीत बसायचं नसतं कधीच