शोध स्वत:चा
शोध स्वत:चा

1 min

427
मी जन्मताच तयार झाले नाते
आईची मी होते सोनुली
अन् बाबांची छकुली
आजी, आजोबांची मी नात होते
तर कोणाची पुतणी, भाची असे नाते
शाळेत गुरुजींची शिष्या होते
अन् वर्गातल्या मुलामुलींची
वर्गमैत्रीण होते
लग्नानंतर मी
माझ्या नवऱ्याची बायको झाले
सासू सासऱ्यांची सून, तर
नणंद, दिराची वहिनी झाले
कोणाची मामी तर
कोणाची काकी झाले
नंतर मुलांची आई झाले
पुढे सुनांची, जावयांची सासू झाले
त्यांच्या मुलांची आजी झाले
या सर्व नात्यांमध्ये मात्र
मी कोण आहे हे
मलाच मी शोधीत राहिले
मलाच मी शोधीत राहिले.